मी आहे पुणेकर इंजीनियर.इथेच लहानपण,आणि पुढचे.मी भटकंती विषयी लिहतो. रोजच्या वाटांवर चालून कासावीस झ्हाले की आडवाटेवरची पायवाट पकडण्याचे पिंड. ही पायपीट म्हणजे अगदी दूरची, असेही नाही. घाट, दऱ्या, डोंगर, दुर्गांच्या देशात मनमुराद वावर करायचा. नखशिखांत भिजविणारा पाऊस, रस्त्यावर उतरलेले धुके, अंग गोठविणारी वाऱ्याची बेधुंद अदाकारी अनुभवायला नेहमीच आतुर. अनेक ज्ञात-अज्ञात दुर्गांच्या वाटा धुंडाळायाचा मानस. सोलो ट्रेकिंगचा असाध्य रोगी. केव्हाही निघा आणि कुठे ही फिरा......कसलेच बंधन नाही. फोटोगिरीच्या व्यसनी गेलेला. सह्याद्री अगदी जिव्हाळ्याचा विषय.
"अहा देश कसा छान - माझं हरलं भान, हिरवं हिरवं रान - कवळं नागनेली पान, कसा पिकला ग गहु हरभरा - वरी शाळु-मक्याचा तुरा, महाराष्ट्रदेश सुंदरा - सोनेरी गुढी मंदिरा ..." असं बेभान करणारं सौदर्य दगडफुलांच्या देशातही आपल्याला वेड लावतंच .... पण नंतर काय होतं? मळ्यांच्या बागशाही दर्शनानं सुखावलेलं पोटरीला आलेल्या कणसांच्या गंधानं धुंदावलेलं आपलं मन सह्याद्रीवरून खाली झेपावतं सागरतीरी, कुळागारांत भटकून येतं तर कधी जातं क्षितिजापावत पसरलेल्या वाळवंटात, महाल हवेल्यांत ... किंवा अप्रूप वाटावं अशा पाणवठ्यांवर रंगश्रीमंत वस्त्रांच्या, बिलोरी काकणांच्या झगमगाटात रंगील्या राजस्थानात ... शिवाय नेपाळ, लदाख या अद्भुतांच्या राज्यांत आणि कधीही न उलगडणार्या हिमालय नावाच्या रहस्यात ... - वसंत बापट