गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

पुणे ५२

१. सिंहगड वर दर रविवारी न चुकवता पिठले भाकरी व मटका दही यावर ताव मारणे.
२. नादब्रम्ह, शिवगर्जना, रमणबाग, गरवारे इ. ढोल पथकांचे गणपती विसर्जन मिरवणुकीत तासंतास गजर ऐकणे.
३. पुणेरी पाट्या तयार करणे.
४. श्रीकृष्ण मिसळ चापणे.
५. दरवर्षी माऊलींच्या पालखी बरोबर दिवेघाटापर्यंत पायी वारी करणे.
६. फर्ग्युसन रस्त्यावर उगाचच फिरणे.
७. पहाटे तीन वाजता नळस्टौप अमृत-तुल्य येथे कटिंग आणि पोहे खाणे.
८. पुरषोत्तम करंडक डोक्यावर घेणे.
९. विद्येचे माहेरघर म्हणून मिरवणे.
१०. बाबुगेनु ची दहीहंडी अनुभवणे.
११. सवाई गंधर्व महोत्सव आणि वसंतउत्सवास हमखास हजेरी लावणे.
१२. किमान एक दुचाकी बाळगणे आणि दुचाकी वरून हवा करणे.

१३. फॅशन स्टेटमेण्ट म्हणून भिकबाळी कानात टोचून घेणे.
१४. पाडव्याच्या पहाटे जंगी पेहराव करून सारसबागेत तळ्यातल्या गणपतीच्या साक्षीने मित्रांसमवेत न चुकता दीपोत्सव साजरा करणे.
१५. बर्गर किंग, मेक' डी, सीसीडी इ. ठिकाणी महिन्याआड जुन्या मित्रांचा कट्टा रंगवणे.
१६. झेड ब्रिज वर ती'ला घेऊन जाणे आणि तासंतास रस्त्यावरच दुचाकी लावून फुठ्पाथ नजीकचे कठडे काबीज करणे.
१७. विशेष पास काढून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे दीक्षांत समारंभ अनुभवणे.
१८. सातासमुद्रापार शिक्षणाच्या / कामानिमित्ताने जाणे आले तरीही शिदोरीला न विसरता चितळेंच्या बाकरवड्या बाळगणे.
१९. पुणे आंतर-राष्ट्रीय मेरेथोन मध्ये पुढल्या वर्षी नक्की जायचे असा दरवर्षी संकल्प सोडणे.
२०. गणपतीवर जीवापाड आस्था असणे आणि लोकमान्यांनी पुण्यात सुरु केलेल्या गेणेशोत्सवाचा आभिमान जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तो पुणेरी पद्धतीनेच साजरा करून दर्शविणे.
२१. पुणे तिथे काय उणे, वारंवार सांगणे.  

२२. सुदर्शन रंगमंच येथे शाळेतल्या मित्राचे 'माय गोड पुणे' नाटक भारतीय बैठक मारून पाहणे.
२३. आम्ही १२' चे म्हणून मिरवणे.
२४. दुचाकी, चारचाकी यांच्या नंबर प्लेट्स वाट्टेल त्या पद्धतीने मोडीफाय करणे.
२५. मान्यवर व्यक्तींचा पुणेरी पगडी देऊन सन्मान करणे.
२६. वैशाली'ला सकाळची कॉफी पिणे आणि बिझनेस च्या गप्पा गोष्टी करणे.
२७. लक्ष्मी रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी चढाओढ करणे.
२८. मस्तानी चाखणे.
२९. घाशीराम कोतवाल येथे राहात होते यासारखे फलक वाड्यानबाहेर लावणे.
३०. सदाशिव पेठेत राहणाऱ्या प्रत्तेक व्यक्तीचा विशेष आदर करणे.
३१. सुप्रसिद्ध रेम्बो सर्कस शहरात आल्यावर प्राणी नसल्यामुळे निषेध करत कानाडोळा करणे.

३२. महात्मा फुले मंडई येथे पहाटेच्या वेळी फेरफटका करणे.
३३. बुधवार पेठ भागात जाणे टाळणे.
३४. पर्वती टेकडी वर रोज सायंकाळी फेरफटका करणे.
३५. दगडूशेठ मंदिरासमोर बाहेर रस्त्यावरच उभा राहून वाहतुकीची कोंडी करणे.
३६. 'किमया' येथे नवनवीन कल्पनांचे आराखडे तयार करणे.
३७. पुणे विद्यापीठतून पदवी घेतल्याचे अभिमानाने सांगून सर्वत्र मिरवणे.
३८. शनिवार वाड्याच्या बाहेर कट्ट्यावर बसून त्या भव्य वास्तूला वारंवार निरखने.
३९. डेक्कन-जिमखाना टेनिस कोर्ट येथे टेनिस खेळणे.
४०. महात्मा गांधी रस्ता येथील वौकिंग प्लाझा येथे फिरणे.
४१. मोमीनपुरा येथे ईद च्या काळात चविष्ट मेजवाणींचा आस्वाद लुटणे.
४२. श्रीकृष्ण थीएटर मधील लावल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या नावांवर लक्ष ठेवणे.
४३. दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर टाळणे.
४४. पु.ल.देशपांडे उद्यानात मित्र/ मैत्रिणींचे वेग-वेगळ्या पोझेस घेऊन फोटो-सेशन करणे.
४५. पेशवे पार्क येथे क्वचित भटकणे.
४६. स्वारगेट चौक येथे प्रवास करणे टाळणे.
४७. पाताळेश्वर मंदिरात अभ्यास करणे.
४८. पाषाण तलावावर गळ टाकून मासेमारीचा आनंद लुटणे.
४९. बाणेर टेकडी येथील तुकाइ मंदिरातून सूर्यास्त पाहणे.
५०. तळजाइ पठारावर क्रोस कंट्री करणे.
५१. समोरच्याचा माज स्वत: माज करून उतरवणे.
५२. पुणेरी संस्कृतीचा छाप जगभर उमटवणे.
 
 


या गोष्टींमुळे पुणे मला आवडते.  
 
footer


??ा?ी? ?ि?ि?्?ा?ा?ी ??ी? ??ा?्?ा? ?ु??ा ??्? ?ा?ा.