शुक्रवार, २५ डिसेंबर, २००९

` भुईकोट-शिवसृष्टी ` इतिहासाच्या वाटेने !

          डिसेंबर बारा योग आला भुईकोट अकलूजला जाण्याचा! निमित्त होत भावाच्या लगनाच ! मग काय स्वारी निघाली पहाटेच! साहजिकच एस.टी ने.आधीच बुकिंग केल्याने त्रास झाला नाही ! आषाढी एकादशी असल्याकारणाने गाड्यांना तुफान गर्दी होती ! स्वारगेटला निघालेला तो लाल डब्बा स्टोप घेत घेत माळशिरस ला थांबला! तिकडून मी वडाप पकडून अकलूज गाठले ! साधारण दोन कि.मी चालत गेल्यावर भुईकोटला जाऊन धडकलो एकदाचा ! एम.टी.डी.सी. ने  ज्या पद्धतीने हा परिसर री-डेवलप केलाय , खरच त्यांचे शतश: धन्यवाद !!! लिंबू सरबत घेउन मी किल्यात शिरलो.आणि हरवून गेलो महाराष्ट्राच्याच्या इतिहासात एकटाच.दुपारची वेळ असल्याने जास्त गर्दीही न्हवती !!
शिव इतिहास जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत अवतरला आहे इथे शिल्पातून , केवळ अप्रतिम ! आणि तो पण एका पुणेरी माणसाने साक्षात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या मार्गदर्शनाखाली , माझी छाती उगीचच फुगल्यासारखी वाटली -पुणेकर मी !!! आत काही किल्याच्या प्रतिकृतीही आहेत, सविस्तर माहितीसह ! प्रत्येक शिल्पाशेजारी इतिहासाना उजाळा देणारी माहितीहि देलेली आहे! एकंदरीत २ तास लागले पूर्ण पहायला ! नीरा नदी या किल्या शेजारून वाहत असल्याने मनोहारी दृश्य दिसते तटबंदीवरून फिरताना! किल्याचा मध्यभागी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे ! बुरुजावरून विहंगम असा हा पुतळा किल्याची शान अजूनच वाढवतो !! हिरवळ आत बरीच असल्याने डूलका काढला मिनिट !! फोटोगिरी संपवून मी बाहेर पडलो ते आठवणी साठवून या शिवस्मरनाच्या !!!!!

                           शिवकल्याण  !                              
  भीष्मप्रतिज्ञा !    
जाणता राजा !
फेम !
 
footer


??ा?ी? ?ि?ि?्?ा?ा?ी ??ी? ??ा?्?ा? ?ु??ा ??्? ?ा?ा.