शुक्रवार, ८ जानेवारी, २०१०

` राजगड ` - प्रदक्षिणा !

        मागच्याच महिन्यात राजगड प्रदक्षिणा पूर्ण केली.पुण्यापासून जवळच असल्याने एक दिवसाचा बेत पक्का केला. मी अणि हेमंत दोघांनी मिळून ठरवले "सकाळी सहा वाजता निघायचे काहीही ज्हाले तरी". मग काय,सकाळी माझ्या फटफटी-वरून गाठला राजगड पायथा-गुन्जावने. आठ वाजले होते पहाटेचे. वीकेंड होता, ट्रेकर्सची गर्दी वाढत  होती. कांदे पोहे चापून दोघे निघालो किल्य्याच्या दिशेने.
 

राजद्वार ! 
       गुन्जावन्याहून गडावर जायला तशी टफ वाट आहे. त्याची प्रचिती येते पावसात. आता काही तसा टफ नव्हता रस्ता, ठंडी होती मस्त ! ही वाट चोर वाट या नावाने ज्ञात आहे. वाटेत मनमुराद फोटोगिरी करुन दीड तासात पद्मावती देवीच्या मंदिरात आलो. देवीला प्रणाम केला, व् पुढे निघालो. कचेरीत नोंद करावी लागली, हल्ली बऱ्याच घटना पाहिल्या गड़ाने !
 किल्ला !
      ताक घेउन संजीवनी माचीकड़े कूच केली. ही माची आवर्जुन पाहन्यासारखी आहे. तट बंदी सुस्थितीत अणि तीही दुहेरी - जगात भारी !! बुरुज पाहिले तेही दुहेरी बांधकाम-अप्रतिम वास्तुगिरी !! संजीवनी माचीचा विस्तार बराच मोठा आहे. मधे व्याघ्रमुख-सदर-टेहलनी बुरुज करत माचीच्या टोकावर पोहोचलो. इथून तोरन्याचे विहंगम पसारा दिसतो. याच माचीकडून तोरन्याला वाट आहे.

     फोटोगिरी चालू होतीच दोघांची. ताकाचा दूसरा राउंड घेतला आणि बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. अकरा वाजून गेले होते, बालेकिल्ल्यावरच जेवणाचा विचार करुन झपझप  अर्धा तासात दरवाज्यात पोहोचलो बाले-किल्ल्याच्या. आजही बाले किल्ल्यावर जाताना दगडाच्या खोबनीत हात घालून चढ़ावे लागते. रेलिंग आहे,पण सुस्थितीत नाही.  दुपारचे बारा वाजून गेले असल्याने गर्दी कमी होती. बालेकिल्ल्यावर पाण्याचा टाक्याशेजारी बसून पोटभरनी केली.बालेकिल्ला गडाचा सर्वोच्च भाग आहे.भग्न सदर-राजवाडा अवशेष, पाण्याची टाकी, दोन मंदिरे पेलत बालेकिल्ला आजही सक्षम उभा आहे.
अतुल्य !
     बालेकिल्ला उतरलो त्यावेळी दोन वाजले होते. तिथून सुवेला माचीवर गेलो. ही माची प्रसिद्द आहे ती - नेढ़ या नैसर्गिक चम्त्काराने. माचीचा विस्तार संजीवनीपेक्षा जरा कमी आहे. तटबंदी आजही सुस्थितीत आहे. फोटोगिरी जोरात चालूच होती. अखेर प्रदक्षिणा पूर्ण करुन परत एकदा पद्मावती माचीवर चारला पोहोचलो.
 
 मानाचा  !
                        आजही महाराष्ट्रातील काही आवर्जुन पाहण्यासारख्या किल्ल्यात राजगड सामाविष्ठ आहे तो गडाच्या वास्तुशिल्पकतेने .त्याचा पूर्ण आस्वाद घेत प्रदक्षिणा संपवली,आणि परतीची वारी सुरु केली.

 
                                                                    नेत्रसुख !
 
footer


??ा?ी? ?ि?ि?्?ा?ा?ी ??ी? ??ा?्?ा? ?ु??ा ??्? ?ा?ा.