बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

` नागफणी वसुल ! `

            पुण्याच्या आसपास भटकंतीची अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे पुणेकर जसा वेळ मिळेल तसे हमखास जाऊन येतातच ! पण अशीही काही वसुल अनामिक ठिकाणेही आहेत जिथे किमान एकदा तरी जाऊनच यायला हवे ! खंडाळ्याच्या घाटातला 'ड्युक्स नोज' चा सरळसोट सुळका त्यापैकीच एक ! अगदी पुणे-मुंबई प्रवासात खंडाळा घाटातून जाताना डावीकडे कोकणात कोसळताना दिसणारा हा कातळ म्हणजे 'ड्युक्स नोज'. नाव जरा विचित्रच. विंग्रजी लोकांचा उपद्व्याप दुसरे काय ? नाहीतर हा सुळका 'नागफणी' नावाने सर्वश्रुत आहे. भीमाशंकराच्या इलाक्यातही 'नागफणी' आहे. नाव साधर्म्याने बर्याचदा गफलत होते माझी ! राजमाची वारीत नेहमी खुणावणारी नागफणी अखेर सर करून आल्यावर माझे गेल्या काही वर्षांचे अपूर्ण तप सफल झ्हाले होते. झ्हाले असे, पेपर वाचत एका रविवारी बसलो होतो. गिरीदर्शनचे ड्युक्स नोज चे निवेदन वाचले. तत्क्षणी ड्युक्स नोज चा बेत पक्का केला. नागफणी म्हंटले की जनता किती बेफाम होते ते त्यादिवशी समजले. रविवारी साधारण सात च्या आसपास टाळकी पुणे स्टेशन ला जमली होती. सकाळी सहाच्या सिंहगड एकसप्रेसने खंडाळ्याला जायचे होते. तिथून धबधब्याच्या रस्त्याने नागफणी. पाउस अजिबात न्हवता, तरीही वातावरण सुखद होते. रेलवेतच सर्वाकडून विकासने सेल्फ रिस्क एक्सेप्टन्स फॉर्म भरवून घेतला. रविवारचा दिवस, त्यात पावसाळा, जनता पुरेपूर उत्साहात होती. दोन तासातच गाडी खंडाळ्यात येऊन धडकली.


            खंडाळा पूर्ण धुक्यात गेलेले होते. आम्ही स्टेशन वर जरा सैरसपाटा मारला. स्टेशन वर काहीच गर्दी न्हवती. गिरीदर्शनचे सर्वेसर्वा सतीश मराठे नागफणी डोंगुर त्या दिवशीच्या नागफणी ट्रेक चे तिथेच ब्रीफिंग केले. नाश्ता, चहा आटोपून फोटोगीरीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर घोषणा देण्यात आली, "प्रौढ प्रताप पुरन्दर क्षत्रिय कुलवंतास सिंहासनधिशवर छत्रपती शिवाजी महाराज की जय! " मागोमाग आम्ही आक्रमण !!!.... म्हणत नागफणी कडे कूच केली होती. नागफणी भटकंतीसाठी दोन पर्याय आहेत. पहिला सोइस्कर आणि सोपा मार्ग म्हणजे लोणावळ्याला यायचे, तिथून कुरुवांडे गावाला, पायी टाटा तलावाला वळसा घालून पोहोचायचे. रस्ता डांबरी आहे, चारचाकीनेही जाता येते. तिकडून अर्ध्या तासात नागफणी माथा ! काही भटके आला त्याच रस्त्याने उतरतात तर काही दुसऱ्या बाजूने खंडाळ्यात.


            पण जर तुम्हाला धबधबा वजा ट्रेक वजा नयनरम्य निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर दुसऱ्याशिवाय पर्याय नाही. त्याच वाटेवरून आम्ही गेलो. खंडाळा स्टेशनवरून मुंबईला जाणाऱ्या रेल रूट आम्ही धरला. पहिल्या बोगद्याच्या अलीकडे डावीकडे एक पायवाट लागते. तिथून वर गेले की मोहक बंगल्यांची रांग लागते. अजून जरा पुढे गेले की डावीकडे डोंगरात जाणारी पायवाट लागते. बास, तुम्ही बरोबर आलात ! गेल्या काही वर्षात नागफणी भटकंती करायला आलेले पण वाट चुकून जंगलात हरवलेले भटके आठवले की खूप वाईट वाटते. इतका आटापिटा करून ज्यासाठी आलो तो नागफणी चे दर्शन अजून काही होत न्हवते. सर्व टाळकी पुढे चालू लागली होती. हा परिसर मोसमात गर्द हिरवाइने वेढलेला होता. मस्त दाट जंगलच ! काही अंतरावरच धबधबा ! उजवीकडे दिसणारा खंडाळ्याचा विस्तृत परिसर !


            धुके, पाउस, उन यांचा लपंडाव पहात तासभर कसा गेला ते कळालेच नाही. पुन्हा एकदा दाट झ्हाडी, दहा मिनिटांच्या चढाइ नंतर छोट्या पठारावर येऊन पोहोचलो. डोळ्याचे पारणे फेडणारा समोरचा नजार पाहून मी थक्क झ्हालो होतो. समोर दूरवर नागफणीच्या सुळक्यावर उन्हाचा एक आकाशातून प्रकाशझोत पडला होता. बाकी आजूबाजूला धुके होते. आता नागफणी वर कधी एकदा पाय ठेवतोय असे झ्हाले होते. पुढे निघालो, पुन्हा पठार लागले पण विस्तीर्ण होते. इकडे आमच्या आधी येऊन ठेपलेल्या असंख्य भटक्यांची जमातच होती. व्ह्याली क्रोसिंग करून नागफणीवरून येथे उतरता येते एवढे विस्तृत पठार आहे. या पठारावरून समोर दूरवर प्रदेश दिसत होता. डावीकडे नागफणी आणि नागफणीला जोडूनच असलेले डचेस नोज साद घालत होते.


           मनमुराद फोटोगिरी करीत आणखी एक तास उलटला. माथ्यावर पोहोच्यान्यासाठी आता जरा कष्ट घ्यावे लागणार होते. पहिल्या दोन उभ्या दगडातल्या चढाइ नंतर डचेस नोज च्या माथ्यावर पोहोचलो होतो. डचेस नोज अगदी निमुळते ! त्याच्या टोकाला तर जेमतेम एक माणूस उभा राहील एवढीच जागा ! काही हौशी, धाडसी टाळकी तिथे फोटोगिरी करीत होती. नागफणी चा उभा कडा आता स्पष्ट दिसू लागला होता. दुपारचे दोन वाजून गेले होते. माथ्यावर जनता होती. पाउस शमला होता. धुकेही कमी झ्हाले होते. पाच मिनिटात नागफणी माथ्यावर पोहोचलो.


        
           ती जागाच अप्रतिम होती. प्रशस्त जागा होती. माथ्याच्या टोकाला अन्यथा कुठेही उभारून नजर टाकली की सृष्टीचे खुलून आलेले रेखीव निसर्ग चित्र दिसत होते.बेधुंद वारा आणि इवलेसे पाण्याचे थेंब हळूच मनतरंग उठवून पुढे सरकत होते. पूर्ण ३६० अंशात कुठे नजर पडली तरी तासंतास पाहवा असा देखावा तो ! माथ्यावर असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दोन्ही बाजूला कड्यावर पाय सोडून टाळकी बिनधास्त बसली होती. पायथ्या पासून सुमारे साडे आठशे फुट इतका उंच असलेल्या नागफणीवर आरोहक मंडळींचे अमाप प्रेम ! अनेकांनी त्याचा साधारण तीनशे फुटांचा कडा हातासरशी सरही केला आहे !             सतीश मराठे आम्हाला राजमाची, कोरीगड, सुधागड, सरसगड, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर, माणिकगड, माथेरान दुरूनच हाताने खुणावून दाखवत होते. फोटोगिरी थांबवून पोटोबाला खुश केले. परतीचे वेध लागले होते. पुन्हा एकदा माथ्यावर उगीचच रपेट मारून घेतली आणि परतीचा मार्ग धरला. आम्ही उतरताना कुरुवांडे गावातून उतरलो. तिकडून थेठ लोणावळा गाठले ! सर्व टाळकी येईस्तोवर जाता येणार न्हवते. डुलकी काढली काहीकाळ. आठच्या दरम्यानची लोकल पकडून दहापर्यंत घरी पोहोचलो होतो.

                                  आता नवे तप सुरु झ्हाले होते, ' नागफणी कातळारोहणाचे !' ...

छायाचित्रे : जी.टी.सी
 
footer


??ा?ी? ?ि?ि?्?ा?ा?ी ??ी? ??ा?्?ा? ?ु??ा ??्? ?ा?ा.