बुधवार, २३ जून, २०१०

` कावळ्यागड ` कधीतरी !

गुरुवार दुपार ~
रोहित : कसा आहेस ?
मी : फीट अन फाइन.
रोहित : ट्रेक ?
मी : विचार चालू आहे.    
रोहित : मी मोकळा आहे सध्या. जाऊ परवा. तोरणा ?
मी : उद्या कळवेन ...
शुक्रवार मध्यरात्र ~
रोहित : वरंध घाटाला धप्पा मारून येऊ.
मी : ठरल तर मग वरंध घाट-कावळ्यागड.


         वर्षभरानंतर पुन्हा वरंध्यातील कावळ्यागडाचा मी आणि रोहितने एका दिवसाचा मनसुबा आखला. 'भरल्या पोटी' निघायचे ठरले. रोहितच्या फटफटी 'प्या.प्रो' वरून जायचे होते. दहाच्या आसपास आम्ही निघालो आणि उनाड दिवसाची सुरुवात झ्हाली. आभाळ आले होते, पाउस न्हवता. हवेत गारवा होता. कालच बरसून गेलेल्या पावसाने हिरवळ उगीचच डोके वर काढू लागली होती. महा मार्गावरून फटफटीने वेग धरला, आमच्या पुढच्या ट्रेक च्या गप्पानीही वेग धरला ! एक का काय ! सगळा महाराष्ट्र ! एव्हाना आम्ही भोरला पोहोचलो होतो. अकरा वाजून गेले होते. भोर तालुक्याचे ठिकाण. वर्दळ कमीच तरीही. शिवाजी राजांचा अश्वारूढ पुतळा चौकात आजही दिमाखात उभा आहे. चौकातून डावीकडे रोहीद्याला वाट जाते आणि सरळ थेट वरंध्यात.  हॉटलात पोहे आणि वडा-पाव चापायला थांबलो. पोटाची खळगी भरली होती, आणि अंगात नवचैतन्य संचारले होते.


        बारा वाजले होते. गाडीने रस्ता धरला तसा डावीकडे रोहिडा खुणावू लागला आणि पुन्हा रोहितच्या रोहिड्याच्या पूर्वीच्या ट्रेकच्या आठवणीत गुंतलो. तिथे म्हणे भारतातील दुर्मिळ ओर्चीड चे आणि अशीच असंख्य जातीची फुले फुलून येतात. भारीच !! कॅमेरात दुरूनच रोहीद्याचे दोन बुरुज बंदिस्त करून पुढे निघालो. भोरपासून ते घाटापर्यंतचा प्रवास हा एक वेगळाच अनुभव ! डावीकडे दुरुच दूर सह्याद्री हात पसरून भटक्यांना जणू बोलावतोय. पुढे गेल्यावर नजरेत भरते रायरेश्वराचे विस्तृत पठार आणि नीरा देवधर धरण. मनमुराद फोटोगिरी चालूच होती. चौकटीबाहेरील जग छोट्याश्या चौकटीत बांधायचा माझा नेहमीचा प्रयत्न हा !!


         पुन्हा एकदा पुढचा रस्ता धरला. आता एकीकडे नीरा देवधर धरणाचे ब्याकवोटर आणि दुसरीकडे कोकणातील अगदी कोकणातील उतरत्या चापारांची घरे, वळणावळणाचा रस्ता आणि लाल माती , काय बोलणार तासंतास इथेच उभे राहावून डोळ्यात साठवून घ्यावेसे ते सजीव चित्रच !! साधारण दीड वाजता घाटाच्या खिंडीत पोहोचलो. एकीकडे देश आणि एकीकडे कोकण !!   
कोकणात दूरपर्यंत पावसाचे निशाण न्हवते , ढग उगीचच घिरट्या घालत होते.


        कावळ्यागड कुठे आहे भाऊ ?? - रोहित
       ५ कि.मी वाघजाइ कडून उजवी कडे - गावकरी
        धन्यवाद - रोहित            
  
       मागल्या वेळेस मी आलो होतो त्यावेळी मस्त धुके होते त्यामुळे रस्ता पुन्हा विचारून पुढे सरकलो. दोन वळणे घेतल्यावरच " जिब्राल्टर ऑफ इस्ट" नजरेत भरला. आणखी तीन वळणे घेतल्यावर वाघजाई. इथे बर्याच भजी पावाच्या टपर्या आहेत. वाघजाई संमोर खाली कोकणात कोसळणारे अनंत धबधबे पावसात येतात. पावसाळ्यातला स्वर्गच !!! इथून अर्ध्या तासाच्या अनतरावरच गड आहे. दोन भजी पाव बांधून घेतले, गाडी वाघजाइपाशी लावून गड गाठला.दुपारचे तीन वाजले होते.


        या गडाचा इतिहासात उल्लेख आढळत नाही. पण हा किल्ला घाटमाथ्यावर पहारा ठेवण्यासाठी आसावा. गडावरून चोफेर लांबपर्यंत प्रदेश दिसतो. गडावर एक छोटेखानी मंदिर आणि बैठकीचे अवशेष दिसतात. दुरून तोरणा, रायगड , वरंध घाट , कोकणातील गावे दृष्टीस येतात. गडावर पाण्याची टाकी नाहीत. पण वाघजाइच्या डोंगरावर सात छोटे तलाव आहेत. गडावरची  भ्रमंती संपवली आणि उतरणीचा मार्ग धरला. गड उतरल्यावर भजी पावाचा आस्वाद घेतला. वाघजाइला येऊन ताक मारले आणि पुण्याचा रस्ता धरला. घाटात येताना करवंदे खाऊन होती न्हवती तेवढी भूक भरवली आणि गाडीला शेवटची किक मारली.

गुरुवार, २० मे, २०१०

` कात्रज ते सिंहगड ` - पायाला भिंगरी !

          आज ३० जुलै २००७, पुरस्कार वितरण सोहळा एका 'अविस्मरणीय' शर्यतीचा. "कात्रज ते सिंहगड'' डोंगरमाथ्यावरून झ्हालेल्या या शर्यतीचा.आम्ही शर्यत जिंकलो न्हवतो तस पहिलो तर, पण एक वेगळाच आनंद होता ती पूर्ण केल्याचा.

                                                                    एक आठवड्यापूर्वीची गोष्ट.आमचा टी.इ चा निकाल लागायचा होता.त्यामुळे निश्चिंत होतो.तरी प्रोजेक्ट सर्च चालूच होता आणि प्लेसमेंटसाठी कंपन्याची रीघ यायला सुरु झ्हाली होती. तसे व्यस्तच रुटीन होते.का कुणास ठाऊक बऱ्याच दिवसात ट्रेक चा योग आला नव्हता. पावसाळ्याचे दिवस होते. तुफान पाऊस होता या वर्षी.२ वर्षाभारापुर्वीच मुंबईत पावसाने हाहाकार घातला होता तो आठवत होता. या मोसमात काहीतरी मोठे करायचा असा माझा बेत होता. वातावरण निर्मिती आधीच झ्हाली होती.
                                            
         वृत्तपत्रामध्ये एनडुरो३ "कात्रज ते सिंहगड - अडव्हेनचर रेस" ची जाहिरात याच काळात रोज झ्हळकत होती.'अनिरुद्ध' आणि 'अनंत' ला बातमी धाडली.या शर्यतीची संपूर्ण माहिती काढण्यासाठी 'एन.इ.एफ' चे ऑफिस गाठले.शर्यतीसाठी तिघांचा सहभाग अनिवार्य होता.तिघांची 'टीम'च असणार होती.आम्ही टीमचे "टौर्कं" नामकरण केले. डॉक्टरांचे 'सहमती' असलेले पत्रही लावावे लागले.फॉर्म चे 'सबमिशन' करून शर्यतीचा श्रीगणेशा केला.

                                                                                                                भलतीच शक्ती अंगात संचारली होती. २० कि.मी अंतर होते, थोडे कि काय ! पूर्वी दोनदा लोणावळा ते राजमाची  केला असला कारणाने तसे काही अशक्य वगैरे न्हवते. त्यात अनिरुद्ध (लीडर), अनंत सारखे 'जातीने भटके' असल्यावर काय विचारूच नका !

          अखेर २७ तारीख उजाडली.आम्ही तिघे जेवून दुपारी दोनलाच घरातून निघालो.कात्रजच्या चौकातून टमटम पकडून बोगद्यात उतरलो. पावसाळ्याचे दिवस असल्याने ढगाळ वातावरण होते पण पाउस न्हवता.आम्ही साधारण साडेतीनच्या आसपास डोंगरावर पोहोचलो. त्यावेळी फक्त आंम्ही आणि एन.ई.एफ चे 'मार्शल्स' असावेत तिथे.फ्ल्याग ऑफ ला बराच वेळ होता.आम्ही मस्तपैकी डोंगरावर फिरून टाईमपास करायला लागलो.कात्रजच्या डोंगरावरून पुन्यनगरीचे अवर्णनीय रूप डोळ्यात साठवून घेतले. उगीचच वाटले चेस आणायला हवा होता.ओमकार ने दिलेल्या मेग्नेट चेसची आठवण येतच राहिली.

         संध्याकाळ होता होता अनेक टीमची गर्दी वाढू लागली. एरवी मोकळ्या वाटणाऱ्या त्या कात्रजच्या डोंगरावर मुक्तछंदी माणसे जमली होती.अजूनच तो बहारदार झ्हाला होता जनू. सातच्या सुमारास रेससाठी टीम सज्ज झ्हाल्या आणि तसा पाउस सुरु झ्हाला.'प्रसाद पुरंदरे' एन.ई.एफ चे सर्वेसर्वा यांनी फ्ल्याग ऑफ केला. सिहगडची वारी सुरु झ्हाली.सुरवातीलाच अजस्त्र डोंगर सर करता करता दमछाक झ्हाली.हद्द म्हणजे आम्ही रात्रीचे जेवण काहीच आणले न्हवते.हा एक वेगळाच अनुभव होता.


        सिंहगड गाठायाचाच होता.पहिला डोंगर पार केल्यावर मग सूर सापडला.पाउस सुरुच होता.२८ तारीख उजाडली होती.पण काहीच वाटत न्हवते,भराभर चालत होतो आम्ही.या शर्यतीसाठी रूट आणि चेक पोस्ट चा अंदाज घेण्याजोगा एक दिशादर्शक नकाशा देण्यात आला होता.चेक पोस्ट वरून  गेल्यावरच तुम्ही आपोआपच रूट फोल्लो करणार असे होते ते एकंदरीत.

      

                                                                 चेक पोस्ट वर 'मार्शल्स' लाल दिवा घेऊन दिशादर्शक म्हणून आणि हजेरीसाठी उभे करण्यात आले होते.अनंत कडे हजेरीची शीट होती. तो वाटेत सर्व पोस्ट वर आमच्या तिघांची हजेरी 'मार्शल्स'कडून टिपून घेत होता.अनिरुद्ध आमचा पाथफाइंडर बनला होता कारण त्या मुसळधार पावसात, अंधारात न भटकता शेवटापर्यंत त्याने एकपण लाल दिवा मिस न करता आम्हाला सुखरूप गडावार नेले होते.
        आम्ही निम्यापेक्षा जास्त अंतर कापले होते.पहाटेचे दोन वाजले होते.सिंहगड पायथा येण्याची चाहूल लागली होती.

                                                                                                               विचार करा, उपाशीपोटी - मुसळधार पावसात - बोचरया थंडीत - डोंगर चढ उतरणी तीही वीस एक किमी !!! पायांची क्षमता संपलेली होती, अंगातले त्राण गेले होते पण सिंहगड माथा अजून दूर होता. तरी वाटेत आम्ही हाल्ट घेत आलो होतो. पुढचा आणि शेवटचा पोस्ट माथ्यावरच होता. काही टाळकी आमच्या पुढे तर काही कधीच मागे राहून गेली होती.जगाचा पूर्ण विसर पडला होता.

         अखेर आम्हाला शेवटचा पोस्ट दिसला !!!
"आम्ही शर्यत जिंकलो न्हवतो तस पहिलो तर, पण एक वेगळाच आनंद होता ती पूर्ण केल्याचा."

 छायाचित्रे : एन.ई.एफ
 
footer


??ा?ी? ?ि?ि?्?ा?ा?ी ??ी? ??ा?्?ा? ?ु??ा ??्? ?ा?ा.